शौचालय योजनेत गैरव्यवहार : महिनाभरानंतरही दप्तर तपासणी अपूर्णच


रावेर : रावेर पंचायत समितीतर्फे राबविल्या जाणार्‍या स्वच्छ भारत अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेच्या दप्तर तपासणीचे काम एक महिना पूर्ण होऊनही होऊ शकलेले नाही. या गैरव्यवहारात अनेकांचा समावेश असल्याची शक्यता पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांमधून वर्तविण्यात येत आहे. या प्रकाराची जिल्हा परीषदेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशीची मागणी नागरीकांनी केली आहे.

योजनेत गैरव्यवहाराच्या तक्रारी
तालुक्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी लाभार्थींना 12 हजार रुपये अनुदान दिले जाते. अनुदान देताना पडताळणी व शौचालय बांधकाम केल्याची खात्री केल्यावरच लाभार्थीच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम टाकण्यात येते. मात्र या योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी बीडीओ यांच्याकडे आल्या होत्या त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी बीडीओ दीपाली कोतवाल यांनी मंगळवार, 22 फेब्रुवारीला त्री सदस्यीय समिती नेमून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला दिले होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !