पीजे मार्गाची रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्यांकडून पाहणी
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे एडीआरएम रूकमैय्या मीणा यांनी जामनेर येथे एका कार्यक्रमाला गेल्यानंतर पीजे रेल्वे लाईनीची पाहणी केली. पाचोरा-जामनेर रेल्वे लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणार असून त्यास अवधी असलातरी रेल्वे अधिकार्यांनी त्यानुषंगाने ही पाहणी केल्याचे समजते. एडीआरएम रुकमैय्या मीणा यांनी जामनेर येथील बुकींग ऑफिस, रेल्वे स्थानक, रेल्वे ट्रॅक, ब्रिटीशकालीन 1894 ला निर्मित केलेली पाण्याची टाकीसह तेथील रेल्वेचा परीसर तसेच रेल्वे स्थानकावर पाहणी केली.
पीजे सुरू करण्याबाबत आग्रह
मीना यांनी यापूर्वी सावदा येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती. पीजे रेल्वे बंद असली तरी तेथे सुरू असलेल्या आरक्षण काउंटरवर काम करणारी महिला कर्मचार्यांना चांगले काम केल्याबद्दल शुभेच्छा दिल्यात. एडीआरएम तेथे गेल्याने तेथे काही प्रवासी जमा झाले. यावेळी प्रवाशांच्या सुचना त्यांनी ऐकून घेतल्या. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे तालका अध्यक्ष रतनसिंग परदेशी यांनी एडीआरएम यांना करणी सेनेतर्फे तसेच तेथील रहीवासीयांतर्फे पी जे रेल्वे सुरू करण्यासाठी आग्रही मागणी केली. यावेळीरेल्वे बोर्डाकडून पीजी रेल्वे गाडी सुरू करण्याचे आदेश आले तर पुन्हा ही गाडी सुरू होईल. पीजे रेल्वे लाईन ही ब्राडगेज मध्ये रूपांतर करण्याच्या हालचाली असल्याचे यावेळी चर्चा झाली.

रेल्वे रूळाचे सांधे बदलूनही पाहणी
यावेळी एडीआरएम मीणा यांनी रेल्वे ट्रॅकवर जाऊन त्यावरील मॅनीफॅक्चर दिनांक पाहिली. रेल्वे रुळाचे सांधे बदलून पाहिले. यावेळी त्यांच्या सोबत चीफ ओएस जी.एल.मीणा, सिनीयर ट्रेन मॅनेजर महेश मीणा, कर्मशिअल विभागाचे निरीक्षक जीवन चौधरी, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे तालुकाध्यक्ष रतनसिंग परदेशी, जामनेरचे काही प्रवासी, झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य परीक्षीत बर्हाटे, रमाशंकर दुबे उपस्थित होते.
चार लाखांची लाच भोवली : अक्कलकुवा जि.प.उपविभागाच्या अभियंत्यांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात


