मोठी बातमी : शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची सव्वा अकरा कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त


Pratap Sarnaik मुंबई : सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांची तब्बल सव्वा अकरा कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ईडी पुन्हा अ‍ॅक्टीव्ह मोडवर
मनी लाँड्रींग प्रकरणात पुन्हा एकदा ईडीने मोठी कारवाई केली आहे. यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर आज पुन्हा कारवाई करत एनएसईएल कंपनीच्या संदर्भात कारवाई केली आहे. यात सरनाईक यांनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केलं, बनावट कागदपत्रं तयार केली, खोटी खाती तायर केली आणि त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. 13 हजार गुंतवणूकदरांची 5600 कोटींची फसवणूक केल्याची माहिती ईडीने दिली आहे.

रावेर अल्पवयीन मुलीच्या विनयभंगानंतर 15 लाखांची खंडणी मागितली ; आरोपींची कारागृहात रवानगी

सरनाईकांशी संबंधित कंपन्या
वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे एनएसईएल च्या कर्जदार/ट्रेडिंग सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकित कर्जाची परतफेड आणि इतर गोष्टींसाठी वळवले होते. या संदर्भात केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटींची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन 2012-13 कालावधीत विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टकडे 21.74 कोटी वळते केले. त्यापैकी 11.35 कोटी विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली. ईडीने पैशांच्या या साखळीचा तपास केल्यानंतर प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्या नावे असणारे दोन फ्लॅट आणि जमिनीचा भाग जप्त केला आहे. याची एकूण किंमत 11.35 कोटी आहे.

नंदुरबारजवळ ट्राला-चारचाकीत भीषण अपघात : तिघे ठार





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !