तांदलवाडीच्या संशयीताची पोस्कोच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता


भुसावळ : अल्पवयीन मुलीचे 18 पेक्षा कमी असल्याचे सिद्ध न झाल्याने तांदलवाडी येथील संशयीत आरोपीची भुसावळ सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सीताराम उर्फ रमेश दशरथ नमायते (32) असे निर्दोष झालेल्या वक्तीचे नाव आहे. अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी हा निकाल शुक्रवारी दिला.

निंभोरा पोलिसात दाखल होता गुन्हा
तांदलवाडी येथील एका युवतीला 14 मार्च 2016 या दिवशी नमायते याने दुपारी एकच्या सुमारास मुलीस काही तरी आमिष दाखवून अपहरण करून नेले. त्यावेळी मुलगी 16 वर्ष 11 महिन्यांची होती. या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवार, 21 मार्चला मुलगी निंभोरा पोलिस ठाण्यात स्वत: आली. मुलीच्या जबाबावरून सीताराम विरूध्द पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला व हा खटला येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात चालला.

वय सिद्ध न झाल्याने संशयीत निर्दोष
या खटल्यात 10 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्यात. यात पीडीता, वैद्यकीय अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापक यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. संशयीतातर्फे अ‍ॅड.प्रफुल्ल पाटील यांनी काम पाहिले. याप्रकरणी शुक्रवारी या खटल्याचा निकाल लागला.अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जाधव यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत मुलीचे वय सिध्द न झाल्याने न्यायालयाने सिताराम नमायते याला निर्दोष मुक्त केले.अ‍ॅड.प्रफुल्ल पाटील यांना अ‍ॅड.जया पाटणकर, अ‍ॅड.संजय वानखेडे, अ‍ॅड.दुर्गेश लहासे यांनी सहकार्य केले.

जळगाव तरुणाच्या खुनाने हादरले : चाकूहल्ल्यातील 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !