26 वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरच्या अपघातात मृत्यू


शेगांव : ट्रॅक्टरच्या अपघातात 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील मुरारका शाळेच्या वळण रस्त्यावर हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. आनंद अशोक गवई (26) असे मृत युवकाचे नाव आहे.

वळण रस्त्यावर अपघात
शुक्रवार, 25 मार्च रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान ही घटना मुरारका शाळेजवळ वळण रस्त्यावर घडली. अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी शेगाव शहर पोलिसांनी धाव घेत ट्रॅक्टर ताब्यात घेतलेतर तर अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. रुग्णालयाकडून रात्री सव्वाअकरा वाजता मिळालेल्या मेमोवरून शेगाव शहर पोलिसात नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करुटले हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !