मुक्ताईनगरात काँग्रेस कमेटीतर्फे डिजिटल सदस्य नोंदणीबाबत मार्गदर्शन
मुक्ताईनगर : शासकीय विश्रामगृहात बुधवारी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डिजिटल सदस्य अभियानाबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व निरीक्षक डॉ.जितेंद्र दहाडे यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल सदस्य नोंदणी संदर्भात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून डिजिटल सदस्य अभियानातील अडीअडचणी समजून घेतल्या व डिजिटल सदस्य अभियानात जास्तीत-जास्त सदस्य करून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी काँग्रेस कमेटीचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, व्हीजेएनटी सेलचे प्रवक्ता अॅॅड.अरविंद गोसावी, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, बी.डी.गवई, डॉ.रोटे, प्रा.सुभाष पाटील, राजेंद्र जाधव, निलेश भालेराव, अॅड.राहुल पाटील, संजय चौधरी, नामदेव भोई, अनिल वाडीले, शामराव भोई, संतोष पाटील (काकोडा), विनोद पाटील (सुळे), दुर्गादास पाटील (धामनदे), निखील चौधरी , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



