जळगावात 24 तासात दुसरा खून : रीक्षा चालकाची चॉपरने हत्या
Jalgaon Murder जळगाव : अवघ्या 24 तासांच्या आत झालेल्या दुसर्या खुनाच्या घटनेने जळगावसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. समता नगरातील तरुणाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शिवाजी नगरात नरेश आनंदा सोनवणे (35) या रीक्षा चालक तरुणाचा चॉपरने हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
यावल पोलिसांची मोठी कारवाई : दोन तलवार, कुकरीसह आरोपी जाळ्यात
24 तासात दुसरी खुनाची घटना
जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी नरेश आनंदा सोनवणे (35) याच्यावर चॉपरने हल्ला करण्यात आल्याने त्याचा मृत्यू ओढवला. या घटनेने शहर व जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. समता नगरातील खून करणार्या विवाहितेच्या पतीला पोलिसांनी गजाआड केले असून शिवाजी नगरात झालेल्या हत्येच्या संदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जळगावातील तरुणाचा खून : आरोपी पतीला अटक


