जळगावचा छायाचित्रकार नाशिकमधील अपघातात ठार


जळगाव : शहरातील व्यावसायिक छायाचित्रकार लग्नाच्या ऑर्डरसाठी नाशिक येथे गेल्यानंतर परतीच्या प्रवासात ा नाशिक ते मालेगाव दरम्यान छायाचित्रकारांच्या कारसह वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात एका छायाचित्रकाराचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. शनिवारी पहाटे दोन वाजता हा अपघात झाला. धनराज उर्फ विक्की प्रकाश चव्हाण (30, रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) असे मृत छायाचित्रकाराचे नाव आहे. क्षण स्टुडिओ नावाने त्यांचे फर्म आहे.

लग्नाहून परतताना अपघात
चव्हाण यांचे मोठ भाऊ निलेश, विनोद दांडगे, कल्पेश पाटील असे चौघे दोन दिवसांपासून नाशिक येथे एका लग्नाच्या ऑर्डरसाठी नाशिक येथे गेले होते. शुक्रवारी रात्री काम आटोपल्यानंतर ते कारने (एमएच 22 डी 4444) जळगावी येण्यास निघाले होते. मालेगावच्या सौंदाणे गावाजळ एका ट्रॅव्हल्सने कारला धडक देऊन 100 फुटापर्यंत कारला फरफटत गेलेे. याचवेळी समोरून एक ट्रक आला. त्यालाही ही दोन्ही वाहने धडकली. या ट्रकमध्ये असलेल्या गायी जखमी झाल्या. कारमधील चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. नीलेश चव्हाण, कल्पेश पाटील व विनोद दांडगे हे जखमी झाले. धनराज चव्हाणवर शनिवारी जळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !