कोथळीतील मुक्ताई मंदिरासाठी पाच कोटींचा निधी मंजूर
मुक्ताईनगर : संत मुक्ताई महाशिवरात्री माघवारी यात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती मुक्ताई यांच्या कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील मूळ मंदिरात पहाटे पूजा व अभिषेकसाठी आमदार चंद्रकांत पाटील हे सपत्नीक आले असता येथे मंदिराचे पुजारी व भाविक वारकर्यांनी कोरोना काळापासून निधी अभावी मुक्ताई मंदिराचे बांधकाम रखडलेले असल्याची माहिती दिली होती.यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले होते. यानंतर त्यांनी अधिवेशन काळात राज्याचे पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी तातडीने 5 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.
निधी परत जाऊ देण्याचा करंटेपणा करू नका
कोरोना काळात निधीवर कात्री
मंदिराचे हेमांडपंथी लुकचे काम प्रगती पथावर होते परंतु कोरोना काळात शासनातर्फे सर्वच निधींवर कात्री लावण्यात आलेली होती. याचा परिणाम जुनी कोथळी येथे सुरू असलेल्या मुक्ताई मंदिराच्या बांधकामावर झाले व गेल्या दोन वर्षांपासून काम बंद पडलेले होते. दरम्यानच्या काळात वारकरी व भाविकांना सदरील काम तत्काळ पूर्णत्वास जावे, अशी आशा होती परंतु कोरोना विश्व महामारीने सर्वच आशांवर पाणी फिरले होते परंतु आमदारांनी याबाबत पाठपुरावा केल्याने या बांधकामावर सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद झाल्याने आता लवकरच मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास जाईल, अशी निर्माण झाली आहे.

शिवसेना तोडण्याची घोषणा करणारे आता महाविकास आघाडीही तोडतील ! आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर पलटवार


