भुसावळात सिंधी समाजातर्फे सामूहिक श्री भगवान झुलेलाल महोत्सव

सिंधी नववर्ष चंट्रीचंड्रला होणार उत्सवाचा समारोप


भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील सच्चो सतराम चौकात श्री. झुलेलाल महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या धर्तीवर 11 दिवस सिंधी समाजाचे इष्टदेव श्री झुलेलाल भगवान यांच्या पार्थिव मुर्तीची स्थापना करण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील सिंधी समाज एकवटला आहे. सिंधी नववर्ष चंट्रीचंड्र 2 एप्रिल या उत्सवाचा समारोप होईल.

समाज संघटनासाठी महाउत्सव : निक्की बतरा
सिंधी समाज वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागला गेला आहे, यामुळे भगवान झुलेलाल यांचा कुठेतरी विसर पडत चालला आहे. समाजबांधव कोणत्याही पंथांत असले तरी सर्व समाजाचे इष्टदैवत श्री. भगवान झुलेलाल आहे, हे विसरता कामा नये. यामुळे या महाउत्सवाची सुरवात केली. आगामी काळात या महाउत्सवाचा पॅटर्न गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाप्रमाणे संपूर्ण देशातील सिंधी समाजबांधव साजरा करतील. नवीन पिढी श्री. झुलेलाल यांच्या संस्काराने घडावी, हा या मागील उदात्त हेतू असल्याचे निक्की बतरा म्हणाले. उत्सवानिमित्त दररोज सायंकाळी संत्संग, प्रार्थना (पलव) आदी धार्मिक कार्यक्रम होत आहे. . या उत्सवाचा समारोप 2 एप्रिल रोजी मिरवणूक काढून होणार आहे. इष्टदेवता श्री. झुलेलाल यांच्या पार्थिव मुर्ती स्थापनेचा समारोप होईल तर श्री. बेहराणा साहेब व अखंड ज्योतीचे तापीनदीपात्रात विसर्जन केले जाईल. यावेळी समस्त सिंधी समाजबांधवांची उपस्थिती राहिल.



यांचे उत्सवासाठी विशेष सहकार्य
श्री झुलेलाल महाउत्सवासाठी जय झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट, जय झुलेलाल मंदिर (मिराबाई), एसएसडी मंडळ, श्री. गोधडीवाला धाम, सिंधी समाज महिला मंडळ, जॉनी मेघाणी, अजय नागराणी, अनिल रोहडा, सनी बतरा, विक्की रामानी, मनिष कुकरेजा, ओम दुंबा, अजय कमनानी, अमर बजाज, अनिल दरडा आदींसह सर्व सिंधी समाज बांधवांचे सहकार्य मिळत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !