भुसावळात लेडीज इक्वलिटी रनमध्ये धावल्या 427 महिला
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशना उपक्रम
भुसावळ : स्त्री- पुरुष समानता, स्वच्छता, निरायम आरोग्याचा संदेश देण्यासाठी भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी लेडीज इक्वलिटी रन घेण्यात आला. या उपक्रमात शहरासह जिल्ह्याभरातील 427 महिलांनी सहभाग घेतला. तीन, पाच व दहा किलोमिटर या तीन अंतराच्या गटात हा रन झाला. सकाळी रेल्वे क्रिडांगणापाासून सुरवात झाली.
स्पर्धकांच्या फुलांच्या वर्षावाने स्वागत
बाजारपेठ पोलिस स्टेशन व वाल्मीक चौक या ठिकाणी महिला धावपटूंवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. राधाकृष्ण प्रभात फेरी, ज्येष्ठ नागरीक संघ, सिंधी कॉलनी येथील जय झुलेलाल ग्रुप, सूर्यकन्या तापी ग्रुप, महाराष्ट्र पोलीस दल व शहर वाहतूक शाखेतर्फे ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाचे व धावपटूंचा रन अधिक सुरक्षित असावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आला.


यांची होती उपस्थिती
गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, साईजीवन सुपर शॉपीच्या संचालिका कविता कोठारी, भेल इंडिया लिमिटेडचे जावडे, हॉटेल मल्हारच्या संचालिका किर्ती धनगर, न्यूट्रीमॅक्सच्या सुप्रिया पाटील, जागृती भावसार, डॉ.सोनाली महाजन, स्पर्धेच्या सदिच्छादूत प्रेमलता सिंग, ओवी वाकचौरे, मृदुला चिद्रवार, संयोजिका डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, प्रा.प्रवीण फालक, प्रा.प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


