गव्हाला शॉर्ट सर्किटने आग : बोरखेडा येथील शेतकर्‍याला लाखोंचा फटका


मुक्ताईनगर : तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकर्‍याच्या शेतात शॉट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीमुळे शेतातील ठिबक व पीव्हीसी पाईप जळून खाक झाले.

अचानक लागली आग
मौजे बोरखेडा जुने येथील शेतकरी सुनील नथु उमाळे आणि प्रकाश वानखेडे यांच्या राजुरा शिवारातील गट क्रमांक 60/4 यांच्या दीड एकर शेतात अचानक शॉट सर्किट होवून आग लागली. शेतातील गहू पिकाला आग लागल्याने गव्हासह शेतातील ठिबकसह पीव्हीसी पाईप जाळून खाक झाल्याआग लागल्याचे समजताच गावचे पोलीस पाटील मोजीलाल शांताराम पवार, स्वप्नील लक्ष्मण पवार, शेतकर्‍यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे बाजूला असलेले अन्य शेतातील गहू सुरक्षीत राहिला. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून शेतकर्‍यास आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !