भुसावळात 12 मद्यपी वाहनचालक कारवाईच्या ‘बाटलीत’


भुसावळ : डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाणे व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी नाकाबंदी करीत 12 मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली तसेच 207 वाहन धारकांकडून 41 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

नोकरीच्या बहाण्याने लोकायुक्त इन्स्पेक्टरने केला तरुणावरच अनैसर्गिक अत्याचार

कारवाईने उडाली खळबळ
गांधी पुतळा, शहर पोलिस ठाणे, हंबर्डीकर चौक, बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अष्टभुजा देवी मंदिर परीसर, नाहाटा कॉलेज चौक आणि बाजारपेठ पोलिस ठाणे समोर नाकाबंदी करण्यात आली. शहर, बाजारपेठ व शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. यावेळी 207 वाहनधारकांकडून प्रत्येकी 200 रूपये प्रमाणे दंड करण्यात आला. मद्य प्राशन करून वाहने चालवणार्‍या 12 चालकांविरोधात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव केस करण्यात आली.



15 वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !