नायगावात आगीत दोन घरे खाक : सुदैवाने प्राणहानी टळली
Naygaon Aag यावल : तालुक्यातील नायगाव येथे सोमवारी सकाळच्या सममारास मध्यवस्तीतील दोन आग लागल्यानंतर ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली. ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दोन गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र दोन घरातील संपुर्ण साहित्य जळाल्याने कुटुंब उघड्यावर आले. प्रशासनाने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबत या कुटुंबांना तातडीची मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.
नोकरीच्या बहाण्याने लोकायुक्त इन्स्पेक्टरने केला तरुणावरच अनैसर्गिक अत्याचार
नायगावातील कोळीवाड्यात अचानक लागली आग
नायगाव, ता.यावल येथे महादेव मंदिराच्या मागे कोळीवाडा असून या कोळीवाड्यात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास विकास गोविंदा कोळी व गोविंदा काळू कोळी या शेतमजुरांच्या घराला अचानक शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. दोघा कुटुंबातील लोक सकाळपासून शेतात कामाला गेले होते. आगीत दोन्ही कुटुंबातील संसारोपयोगी वस्तू, घरातील साहित्य, विद्यार्थ्यांचे शाळेचे पुस्तक, अन्नधान्य खाक झाले.


15 वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार
वेळीच आगीवर नियंत्रणाने अनर्थ टळला
आग लागल्याचे लक्षात येताच व इतरत्र आग न पसरण्यासाठी राजेंद्र कोळी, राजू कोळी, त्र्यंबक टेलर, दोधु कोळी, राजू मिठाराम कोळी, जगदीश पाटील, मिलिंद कोळी, गोपाल कोळी आदींनी धाव घेतली अन्यथ संपूर्ण वाड्यात आग पसरण्याची भीती होती. हातमजुरी करणार्या या कुटुंबातील विकास कोळी यांनी शुक्रवारीच दोन क्विंटल गहू घेतले होते ते देखील या आगीत जळून खाक झाले.
प्रेमसंबंध उघड करण्याची पुतणीला धमकी देत नराधम काकाने केला अत्याचार


