चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचोर्यात नवविवाहितेने गुंगीचे औषध देत पतीसह सासु-सासर्यांना केली बेदम मारहाण X
मामांकडे आलेल्या जामनेर तालुक्यातील तरुणीला पळवले
जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील मामांकडे भेटण्यासाठी आली होती. दरम्यान गुरूवार, 24 मार्च रोजी पहाटे चार वाजता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडीत मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार धर्मराज पाटील करीत आहे.




