भडगावातील 40 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करीत मारहाण
भडगाव : शहरातील एका भागात राहणार्या 40 वर्षीय विवाहितेला मारहाण करून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाण करीत केला विनयभंग
भडगाव शहरातील एका भागात राहणारी 40 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, संशयित आरोपी अमोल दगा पाटील आणि गणेश दगा पाटील (दोन्ही रा.भडगाव) यांनी महिलेच्या घरात बसून तिला लोखंडी सळईने हातावर बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांचा हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली तर एकाने शिवीगाळ करून ‘तू बाहेर भेट तुला उडवून देऊ’, अशी धमकी दिली तर यातील एकाने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी अमोल दगा पाटील, गणेश दगा पाटील यांच्या विरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग सोनवणे करीत आहे.




