जिल्हाधिकारी कार्यालयात 4 रोजी ऑनलाईन लोकशाही दिन होणार


जळगाव : नागरीकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन होत असून 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ई मेलवर अर्ज करण्याचे आवाहन
लोकशाही दिनी ज्या नागरीकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी आपला अर्ज वैयक्तिक स्वरुपाचेच अर्ज श्रेज्ञीहरहळवळपक्षरश्रसरेपसारळश्र.लेा या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावेत सार्वजनिक स्वरुपाचे अर्ज सादर केल्यास ते प्रशासकीय अर्ज म्हणून ग्राहय धरण्यात येऊन लोकशाही दिनांत स्विकारले जाणार नाहीत.



व्हॉटसअ‍ॅप नंबर नमूद करण्याचे आवाहन
अर्जामध्ये व्हॉटसअ‍ॅप नंबर नमूद करावे जेणेकरुन सदर लोकशाही दिनाचा लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन दिला जाईल. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !