40 हजारांची लाच भोवली : नांदगावचा भूमी अभिलेख उपअधीक्षक धुळे एसीबीच्या जाळ्यात
Dhule ACB Team Trap at Nandgaon धुळे : नांदगावच्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला 40 हजार रुपयांची लाच चांगलीच महागात पडली असून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताच आरोपीला बेड्या घातल्या. जुन्या तहसील कार्यालयातील भूमीअभिलेख कार्यालयात मंगळवारी हा सापळा यशस्वी ठरला. विलास पांडुरंग दाणी (44) असे लाचखोर उपअधीक्षकाचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मोसंबी उत्पादकांना 34 लाखांचा गंडा : तिघे भामटे जाळ्यात
40 हजारांची लाच भोवली
44 वर्षीय पुरूष तक्रारदार व त्यांच्या भागीदार यांचे भूखंडाचे अति तातडीचे बिनशेती मोजणी करून त्याचा नकाशा तयार करून देण्याच्या
मोबदल्यात आरोपी विलास दाणी यांनी मंगळवार, 29 मार्च रोजी 50 हजारांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराने 40 हजार रुपये देण्याचे सांगून धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी आरोपीला नांदगावच्या कार्यालयातच लाच स्वीकारताच पकडण्यात आले.


सरकारी अभियंत्याच्या घरात सापडली एक कोटी 36 लाखांची बेनामी रोकड व कोट्यवधींच्या मौल्यवान वस्तू
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, निरीक्षक प्रकाश झोडगे, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, महेश मोरे, संदीप कदम, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, चालक सुधीर मोरे जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
संतापजनक ! : शेल्टर होममध्ये दोन मुलींवर बलात्कार


