जुन्या भांडणाची कुरापत काढून सासूसमोर जावयावर त्रिकुटाचा हल्ला


नाशिक रोड : सासुसोबत बोलत उभे असलेल्या जावयाला तिघा जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी गज आणि दगड डोक्यात मारल्याने जावई गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान सुभाषरोड भागातील रेल्वे कॉलनी रस्त्यावर घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या जावयाचे नाव अतिश पवार (31, रा. गुलाबवाडी, मालधक्का रोड) असे आहे.

तिघांविरोधात गुन्हा
अतिश पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रशांत रोकडे, छवळ्या उर्फ राहुल आणि रोहित रोकडे या तिघा हल्लेखोरांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करीत या हल्ल्यात प्रशांत रोकडे याने लोखंडी गज अतिश पवार याच्या डोक्यात मारून जखमी केले. तर उर्वरीत दोघा संशयितांनी रस्त्यावर पडलेले दगड अतिशच्या डोक्यात मारल्याने अतिश गंभीर जखमी झाला. मारहाण करून तिघा हल्लेखोरांनी अतिशला धमकावत घटनास्थळावरून पलायन केले. पोलीस हवालदार एम.व्ही.दराडे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.



 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !