भुसावळ पालिकेच्या विकासकामांची होणार चार सदस्यांकडून चौकशी

माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांच्या तक्रारीची दखल : गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता


भुसावळ : भुसावळ पालिकेच्या माध्यमातून वर्षभरात झालेल्या विकास कामांची चौकशीसाठी आता जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी याबाबत तक्रार केली होती.

आठ चोरीच्या मोबाईलसह चोरटे भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

माहिती अधिकार कार्यकर्ते उपाध्याय यांची तक्रार
भुसावळ शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांनी 16 जून 2021 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून शहरात पालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकासकामांची चौकशीची मागणी केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दन पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीची नियुक्ती केली असून यात नगरपालिका अमळनेरचे स्थापत्य अभियंता अमोल भामरे, नगरपंचायत शेंदूर्णीचे स्थापत्य अभियंता भैय्यासाहेब पाटील व जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेतील लेखापाल हर्षल वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने पारदर्शीपणे चौकशी केल्यास अनेक गैरव्यवहार समोर येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.



भुसावळातील दुय्यम कारागृहात कैद्याचा मृत्यू : तुरूंग अधीक्षकांसह पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !