भुसावळातील कॅशियस बॉक्सिंग अकॅडमीची चॅम्पियनशीपपदाची दावेदारी कायम


भुसावळ : रेल्वे उत्तर वार्ड लिंपस क्लबमध्ये छत्रपती शाहू महाराज स्पोर्ट अकॅडमीमार्फत घेण्यात आलेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत कॅशयस बॉक्सिंग स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सादरीकरण करीत चॅम्पियनशीप जिंकत तब्बल 26 वर्षापासूनची जिंकण्याची परंपरा कायम राखली.

200 खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेत नाशिक विभागातील क्ले बॉक्सिंग क्लब, सम्राट बॉक्सिंग क्लब, छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी, ब्लू स्टार बॉक्सिंग क्लब, साई बॉक्सिंग क्लब, डीएसए बॉक्सिंग क्लब, ब्लू स्टार बॉक्सिंग क्लब यांच्यासह कॅशियस स्पोर्ट्स बॉक्सिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनह 200 खेळाडूंनी सहभागी झाले.



19 विद्यार्थ्यांनी मिळवले गोल्ड मेडल
या स्पर्धेत कॅशियर बॉक्सिंग क्लबच्या विद्यार्थ्यांनी 19 गोल्ड तर 9 सिल्व्हर मेडल जिंकले. गोल्ड मेडल मिळवणार्‍यांमध्ये लक्ष धुरीया, राजरत्न घोडेस्वार, यश तायडे, ओम तायडे, आकाश मगर, साहिल देवरे, भूषण कुंभार, रीयाज शेख, प्रेम सोनवणे, प्रतीक खंडागळे, प्रतीक सुरवाडे, विभोर मिस्त्री, समीक्षा घोडेस्वार, कोमल झनके, रींकू गोसावी, तनिषा तायडे, अंकिता नवगीरे, अश्विनी बाविस्कर तर सिल्व्हर मेडल मिळवणार्‍यांमध्ये खुशी कोळी, माही तिवारी, जयेश इंगळे, ऋषिकेश नरहरी, रुद्र धुरीया, जयेश कुमार, मोहित लोहार, कृष्णा इंगळे, शौर्य लोखंडे यांचा समावेश आहे.

खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव
यशस्वी खेळाडूंना कोच राहुल घोडेस्वार, सुनील नवगिरे, चुनीलाल गुप्ता, मनोज सूर्यवंशी आदींनी मार्गदर्शन केले. दरम्यान, यशस्वी खेळाडूंचा भुसावळचे आमदार संजय सावकारे, एस.सी.एस.टी.असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम जाधव, माजी नगरसेवक प्रवीण तिवारी, कॅशियस बॉक्स क्लबचे अध्यक्ष राहुल घोडेस्वार, सचिव सुनील नवगिरे, ऑर्डनस फॅक्टरी कामगार युनियनचे सचिव प्रवीण मोरे, कोच मनोज सूर्यवंशी, पत्रकार राजेश तायडे, अशोक धुसीया, ऑडर्नन्स फॅक्टरी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सुरेश नरहिरे आदींनी गौरव केला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !