भुसावळ शहरात आजपासून तीन दिवसीय फुटबॉल टुर्नामेंट
भुसावळ : शहरात 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल टुर्नामेंट व चषकाचे डी.एस.ग्राऊंडवर आयोजन करण्यात आले आहे. प्रथम विजेत्या संघास 21 तर उपविजेत्या संघास 11 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती गोवा क्लब राष्ट्रीय फुलबॉल खेळाडू विवेक जगन सोनवणे यांनी दिली. उद्घाटन कामगार नेते जगन सोनवणे तर बक्षीस वितरण पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याहस्ते होणार आहे. शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण, माजी नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शहरवासीयांना उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रेशन दुकानावरील सेल्समनची आत्महत्या : भुसावळातील मुन्ना सोनवणेंविरोधात गुन्हा


