LOADSHEDDING विजेची मागणी वाढली : राज्यभरात आता आपत्कालीन भारनियमनाचे चटके


LOADSHEDDING भुसावळ : तापमानामुळे विजेची मागणी वाढल्याने शहरात महावितरणकडून मंगळवारी सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेदरम्यान चार फीडरवर आपत्कालीन भारनियमन (LOADSHEDDING) करण्यात आले. शहरातील टिंबर मार्केट, प्रेरणा नगर, इदगाह मैदान व भुसावळ टाऊन या चार फीडरवर हे भारनियमन झाले. पाच वर्षांनंतर शहरात प्रथमच आपत्कालिन भारनियमन झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.

राज्यभरात आता भारनियमनाचे चटके
तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या वीज मागणीमुळे राज्यभरात जी, जी-1, जी-2, इ व एफ या ग्रुपवर आपत्कालिन भारनियमन (LOADSHEDDING) सुरु करण्यात आले आहे. शहरातील चार फीडरवर गळतीचे प्रमाण जास्त असल्याने या भागात मंगळवारी सायंकाळी भारनियमन करण्यात आले. गळती अधिक असलेल्या टिंबर मार्केट फिडर, प्रेरणानगर फीडर, इदगाह मैदान व भुसावळ टाऊन या चार फीडरवर वीजपुरवठा तासभर खंडित होता. सोबतच एमआयडीसी फीडरवरील खडका व परिसरातही एक तास वीजपुरवठा खंडित केला होता. शहरातील इतर भागातील वीजपुरवठा सुरळीत होता.



आगामी काळातही होणार भारनियमन
दरम्यान, भारनियमन (LOADSHEDDING) आणि वीज कर्मचार्‍यांच्या दोन दिवसीय संपाचा संबंध नाही, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आगामी काळातही या प्रकारची स्थिती निर्माण झाल्यास आणि वरिष्ठांचे आदेश असल्याचे भारनियमन होईल, असे भुसावळचे कार्यकारी अभिंयता प्रदीप घोरुडे यांनी सांगितले.

भुसावळातील दुय्यम कारागृहात कैद्याचा मृत्यू : तुरूंग अधीक्षकांसह पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !