इंधनाच्या दरात पुन्हा झाली वाढ : जाणून घ्या नवे दर
जळगाव : जिल्ह्यासह राज्यात इंधनाचे दर आज पुन्हा वाढले आहेत. मागील अनेक दिवसांपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. या दरवाढीमध्ये आज पुन्हा नव्याने भर पडली आहे. राज्यासह जिल्ह्यात बुधवारी इंधनाचे दर प्रति लिटरमागे 80 पैशांनी वाढले आहे. या दरवाढीमुळे इंधन दरवाढ सुरूच असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. डिझेलचे सध्यस्थितीत 100 रुपये प्रती लिटरचा टप्पा ओलांडला आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीवर परीणाम
परकीय देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या आयातीवर परीणाम झाला आहे. त्यामुळे तेल कंपन्यानी मुंबईमध्ये तसेच जिल्ह्यात दरवाढ केलेली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ ते नऊ दिवसांत ही दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलचे दर आज प्रति लिटर 80 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबई तसेच अन्य जिल्ह्यात पेट्रोल 115.88 रुपये लिटर तर डिझेल 100.10 रुपये लिटर दराने मिळत आहे. गेल्या 8/9 दिवसांमधील ही सतत दरवाढ होत आहे. नऊ दिवसांमध्ये इंधनाचे दर लिटरमागे 5 रुपये 60 पैशांनी वाढल्याचे तज्ञानी म्हटले आहे.


पेट्रोल दरात 80 पैशांची वाढ
मंगळवारी पेट्रोलच्या दरात 80 पैसे आणि डिझेलच्या दरात 70 पैशांची वाढ करण्यात आल्याने मोठ्या शहरात पेट्रोलच्या दर 100 रुपयांच्या पुढे गेल्याचे दिसून आले आहे . इंधन दरवाढ सुरूच असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. विशेष म्हणजे देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2021 पासून इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. या काळात कच्चा तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 30 डॉलरची वाढ झाली होती. मात्र, आता निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे.


