संपाला पाठिंबा : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत काळ्या फिती लावून कामकाज
भुसावळ : देशभरात सुरू असलेल्या कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या संपाला भुसावळ आयुध निर्माणीतील कामगारांनी पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनात मंगळवारी आयुध निर्माणी कामगारांनी काळ्या फिती लावून केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला.
ऑर्डनन्सबाहेर कर्मचार्यांची निदर्शने
संरक्षण कर्मचार्यांच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांना घेऊन इडीएसए, संरक्षण क्षेत्राचे खासगीकरण नीती, नवी पेन्शन योजना, लेबर कोड बील व अन्य 24 मागण्यांसाठी आयुध निर्माणी कर्मचार्यांनी मंगळवारी सकाळी केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने केली. संपाच्या सलग दुसर्या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. युनियनचे पदाधिकारी आणि कामगारांनी काळ्या फिती लावल्या.


इंधनाच्या दरात पुन्हा झाली वाढ : जाणून घ्या नवे दर
यांचे आंदोलन यशस्वीतेसाठी परीश्रम
आंदोलनाच्या यशस्वितेसाठी कामगार युनियनचे दिनेश राजगिरे, नीलेश देशमुख, मोहन सपकाळे, विनोद तायडे, किशोर रील, किशोर बढे, नाना जैन, हिरालाल परिस्कर, विनोद धाडे, जितेंद्र आंबेडकर, नितीन देशमुख, दिलीप वायकोले, मिलेश देवराळे यांनी सहकार्य केले.
आयुध निर्माणीत कामगारांनी संपाला पाठिंबा देत निदर्शने केली.
भुसावळातील मुस्लीम कॉलनीतून तीन तलवार जप्त : आरोपी तरुणाला अटक


