महाराष्ट्रातील कोविड लॉकडाऊन उल्लंघणाचे गुन्हे मागे घेणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


Dilip Walse Patil मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये निर्बंधांचे उल्लंघण केल्याप्रकरणी दाखल सर्व गुन्हे राज्य सरकार मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली.

कलम 188 चे गुन्हे मागे घेतले जाणार
कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत आलेल्या दोन लाटांत संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या बाहेर पडण्यावर निर्बंध आले होते. यादरम्यान काही ठिकाणी पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार झाले. निर्बंध न जुमानण्याचे प्रकार झाले. त्यात काहींवर गुन्हे दाखल झाले. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊने बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांना राज्यभर एकत्र करून आंदोलन उभारले होते.



भुसावळातील मुस्लीम कॉलनीतून तीन तलवार जप्त : आरोपी तरुणाला अटक

मंत्री मंडळाच्या मान्यतेनंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया होणार सुरू
कोरोनाकाळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यावरून काही विद्यार्थ्यांवर गुन्हेही दाखल केले होते. वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात आयपीसी कलम 188 चे उल्लंघण केल्याप्रकरणी विद्यार्थी आणि नागरिकांविरुद्ध दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारने ठरवले आहे. मंत्रिमंडळाची या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.

फैजपूरातील मुख्याध्यापकांना 73 हजारांचा ऑनलाईन गंडा





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !