संगमनेरातील बनावट दारू कारखान्यावर आयजींच्या पथकाची कारवाई : तेलंगणातील चौघे जाळ्यात
संगमनेर : नाशिक आयजींच्या विशेष पथकाने बालाजी वाईन शॉप, खटपट नाका, ता.अकोले येथे अवैधरीत्या दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी मध्यरात्री छापा टाकून तेलंगणातील चौघांच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळावरून बनावट मद्यार्क निर्मितीसाठी लागणार्या साहित्यासह 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
आयजींच्या पथकातील पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम व सहकार्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी कारवाई केली. घटनास्थळावरून 146 रीकाम्या बाटल्या, 265 जिवंत पत्री बुच, , 14 ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या रीकाम्या काचेच्या बाटल्या, 18 ओसी ब्लु, रॉयल स्टॅग व मॅकडॉलची बुचे, 12 एक लिटरच्या प्लस्टिकच्या देशी दारू भरलेल्या बॉटल, प्लास्टिक सेलो टेप, प्लास्टिकचे नरसाळे, प्लास्टिक चाळणी व इतर साहित्य असा मिळून 10 हजार 535 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


विजेची मागणी वाढली : राज्यभरात आता आपत्कालीन भारनियमनाचे चटके
यांना केली अटक
मॅनेजर महेश लिंगया हिरेचगिरी, साई किरण बल्यागडम, प्रशांत गौड मुंजा व शंकर अंजगैर वन्हेला (सर्व मूळ रा.तेलंगणा, हल्ली रा.अकोले) यांना अटक करण्यात आली.
भुसावळातील मुस्लीम कॉलनीतून तीन तलवार जप्त : आरोपी तरुणाला अटक


