फैजपुरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण
फैजपूर : मागील जुने भांडण उकरून काढत तरुणाला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना फैजपूर शहरातील सुभाष चौकात घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुभाष चौकात तरुणाला मारहाण
शेख एजाज उर्फ गुड्डू अहमद शेख जाकीर (27, फैजपूर, ता.यावल) हा आपल्या कुटुंबीयांच्या वास्तव्याला आहे. रविवार, 27 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शेख एजाज हा शहरातील सुभाष चौकातील पान टपरीवर पान खाण्यासाठी उभा होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख अल्तमश शेख युसुफ (रा.सिंधी कॉलनी, फैजपूर) याने शिवीगाळ करून मारहाण केली तसेच हातातील लोखंडी रॉडने डाव्या हातावर मारून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी शेख एजाज यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख अल्तमश शेख युसूफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरे करीत आहे.




