मेहकरमधील उपविभागीय कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी


बुलढाणा : जिल्ह्यातील मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीत महत्वाच्या विभागातील कागदपत्रे खाक झाल्याने खळबळ उडाली आहे.

अग्निशमन दलाची धाव
पहाटे ाच वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाला आग लागल्याचे कोतवाल यास दिसून आले, त्यांनी तत्काळ एसडीओ यांना माहिती दिली व नगरपालिकेला कळविण्यात आले. दरम्यान अग्निशमन वाहन येई पर्यंत उपनिबंधक विभाग, आपत्ती व्यवस्थानपन विभाग व निवडणूक विभागातील सर्व फाईल्स व कागदपत्रे जळून गेली आहेत. तसेच याच इमारतीमध्ये असंख्य विभाग असल्याने नगरपालिकेचे अग्निशमन येइ पर्यंत कार्यालयातील सर्व विभाग जळून खाक झाले होते.



तर अप्रिय घटना घडली असती
उपविभागीय कार्यलय शहरातील मध्यभागी असून एक जुनी इमारत आहे. या कार्यलयाच्या आजूबाजूला मोठी मानवी वस्ती आहे. मात्र वेळीच आग विझविल्या गेल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले, अन्यथा आग परिसरात पसरली असती व मोठी घटना घडली असती. मात्र या आगीत मात्र शासकीय कार्यालयाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !