भुसावळात रविवारी मोफत आरोग्य निदान शिबिर
भुसावळ : मराठी नववर्षानिमित्त अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धीरज गणेश पाटील व आर्या अॅडव्हान्स ओडोंटो केयरच्या संचालिका डॉ.रीना योगेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 3 एप्रिल 2022 सकाळी 8 ते 11 दरम्यान आर्या अॅडव्हान्स ओडोंटो केयर, लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ, जळगाव रोड, भुसावळ येथे मोफत आरोग्य शिबिर होत आहे.
विविध आजारांची तपासणी
या शिबिरात लहान मुले, ज्येष्ठ नागरीक आणि महिलांच्या दातांच्या व्याधींची तसेच तोंडाच्या इतर समस्यांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोफत तपासणी दंतरोग व मुखरोग तज्ञ डॉ.रीना योगेश पाटील करतील. श्री रीदयम हॉस्पिटलतर्फे ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेव्हल, शुगर आणि सर्व प्रकारची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक मशीनीद्वारे डोळ्यांची संपूर्ण तपासणी करण्यात येईल. रुग्णाचा मोतीबिंदू निघाल्यास नेत्रम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन
जास्तीत-जास्त नागरीकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. धिरज गणेश पाटील व आर्या ऍडव्हान्स ओडोंटो केयरच्या संचालिका डॉ.रीना योगेश पाटील यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी प्रा.धीरज गणेश पाटील यांच्या 7709044904 व अमित जावरे यांच्या 8208775796 या क्रमांकावर संपर्क करा.


