भुसावळ पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला आरोपी अखेर जाळ्यात

बारीक हातामुळे हातातून बेडी काढत संशयीताने ऐनवेळी संधी साधली संधी ः जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या तांदलवाडीत आवळल्या मुसक्या


भुसावळ : भुसावळ शहर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी ट्रान्सफर वारंटमध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना बुधवारी सायंकाळी जळगाव शहरातील जैन इरीगेशनजवळ घडली होती. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने तपासचक्रे गतिमान करीत आरोपीच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथून मुसक्या आवळल्या आहेत. राजू विक्रम खांडेलकर (20, रा.महालखेडा, ता.मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी तांदलवाडी येथील भावाच्या घरात लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्यास अटक केली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वात एएसआय वसंत लिंगायत, हवालदार दीपक पाटील, नाईक किरण धनगर, नाईक प्रमोद लाडवंजारी, चालक युवराज अशोक पाटील आदींच्या पथकाने गुरुवारी दुपारी पोलिसांच्या तावडीतून पसार झालेला आरोपी राजू कांडेलकर याच्या मुसक्या आवळल्या. दरम्याप, आरोपीला पोलिसांनी बेडी लावली असलीतरी हात बारीक असल्याने आरोपीने झटका मारून बेडीतून हात बाहेर काढला व संधी साधून वाहनाचा दरवाजा उघडून पळ काढल्याचे स्पष्ट झाले होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !