वाढदिवसादिवसानिमिज्ञ स्वखर्चाने ग्रामस्थांना दिली वाचनकट्ट्याची भेट


सावदा : मोठे वाघोदा येथील पत्रकार कमलाकर माळी यांनी वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना एक अनोखी भेट दिली आहे. स्वखर्चाने त्यांनी बसस्थानक परीसरात वडाच्या झाडाखाली बैठक ओट्यावर वाघोदेकर सार्वजनिक वाचन कट्टा सुरू केल्याने गावातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावातील ग्रामस्थांना व गावातील तरुण मुलांना वाचनाची सवय लागावी यासाठी त्यांनी स्वखर्चाने हा समाज उपयोगी उपक्रम राबवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
माळी यांनी आतापर्यंत ग्रामस्वच्छता अभियान, मोफत मोतीबिंदू शिबिर, रक्तदान शिबिर आदी समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. यावर्षी माणुसकी समुहाच्या माध्यमातून सार्वजानिक वाचन कट्ट्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यात काही वाचनीय पुस्तके तसेच दररोज वर्षभर वृत्तपत्र टाकण्याचे काम कमलाकर माळी यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. गावात भरपूर ग्रामस्थांना वाचनाची सवय आहे पण काही ना कारणाने पेपर खरेदी केली जात नाही त्यामुळे समाज ग्रामस्थ एका ठिकाणी येतील यासाठी हा प्रयत्न कमलाकर माळी यांनी केला आहे. या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !