भुसावळात वाढत्या इंधन दराच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन
गॅस सिलिंडरला माल्यार्पण करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
भुसावळ : केंद्र सरकारकडून दिवसागणिक पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ होत आहे शिवाय घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसह खाद्य तेलाचे दरही गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईला जनता वैतागली असून महागाई नियंत्रणात आणावी या मागणीसाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे गुरुवारी निदर्शने
जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान यांच्या नसरवांजी फाईल भागात गुरुवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. यावेळी गॅस सिलिंडरसह दुचाकीला माल्यार्पण करून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला तसेच केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महागाई नियंत्रणात आणा अन्यथा आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. इंधनाच्या वाढत्या दरांसोबत घरगुती वापरावयाच्या गॅस सिलिंडरसह खाद्य तेलाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका सोसावा लागत आहे. केंद्र सरकारने महागाई तत्काळ नियंत्रणात आणावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रसंगी पदाधिकार्यांनी दिला.


यांचा आंदोलनात सहभाग
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान यांच्यासह शहराध्यक्ष सलीम गवळी, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संजय खडसे, जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब खान, अॅड.रंगरेज सहाब, शहर सचिव हमीद शेख, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी.कोटेचा, महिला काँग्रेस शहर उपाध्यक्षा हमीदा गवळी, यास्मीन बानो, शीला इंदी परदेशी, रफिक भाई, निसार शाह, मनीष भाई, सै.रफीक, रीजवान ऊर्फ पापा, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भुसावळ पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला आरोपी अखेर जाळ्यात


