सुनसगावात बंद घर फोडत 68 हजारांचा ऐवज लांबवला
भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव येथे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 68 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. शहरात सुरू असलेल्या चोर्या-घरफोड्यांचे लोण आता ग्रामीण भागात पसरल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. माहितगाराने ही चोरी केली असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
बंद घर चोरट्यांच्या पथ्यावर
भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे शेतकरी रमेश श्रीधर पाटील (75) हे कुटुंबियांसह राहतात. कामानिमित्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांतील सदस्य गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी मंगळवार, 30 मार्च रोजी सकाळी 10 ते बुधवार, 30 मार्च रोजी पहाटेच्या सहा वाजेदरम्यान घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 68 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले.


माहितगाराने चोरी केल्याचा संशय
शेतकरी रमेश पाटील यांच्या कपाटातील लॉकरमधून चोरट्यांनी सात ग्रॅम वजनाची व 21 हजार रुपये किंमतीची दाणी, सात ग्रॅम वजनाचा व 21 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार, आठ ग्रॅम वजनाचे व 24 हजार रुपये मंगळसूत्र-कर्णफुले, नथ व दोन हजार रुपये किंमतीचे चांदीचे जोडवे लांबवले. घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व तालुका पोलिसांनी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शेतकरी रमेश पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस मुसा शेख करीत आहेत.
सेवानिवृत्तीच्या दिवशी लाचखोरीचा डाग : शिरपुरातील गटविकास अधिकार्यासह सहा.लेखाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात


