भुसावळ तालुक्यातील उपद्रवी एक वर्षांसाठी हद्दपार


भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्यासंदर्भात स्थानिक पोलिस प्रशासनाने सुमारे 39 उपद्रवींचे प्रस्ताव भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे पाठवले होते. प्रस्तावावर अंतिम कामकाज होवून नव्याने भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अजय प्रकाश तायडे यास एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी गुरुवार, 31 मार्च रोजी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

2021 मध्ये सादर होता प्रस्ताव
हद्दपारीचे आदेश निघालेल्या अजय प्रकाश तायडे (पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात भादंवि 379 अन्वये चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. 2015 मधील गुन्ह्यात आरोपीला चार हजार रुपये दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली होती तर हद्दपार चौकशी प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आरोपीविरोधात नव्याने एक चोरीचा गुन्हा तालुका पोलिसात दाखल झाला होता. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता व पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे या प्रस्तावाची चौकशी झाल्यानंतर हा प्रस्ताव प्रांतांकडे रवाना करण्यात आला होता.



आतापर्यंत आठ संशयीत हद्दपार
सामाजिक शांततेला अडसरू ठरू पाहणार्‍या आठ उपद्रवींना आतापर्यंत प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी हद्दपार केले आहे तर आगामी काळात आणखी काही उपद्रवींची हद्दपारी शक्य आहे. हद्दपार झालेल्यांमध्ये गणेश रमेश कवडे (गमाडीया प्रेस, जुनी जीन, भुसावळ), राहुल नामदेव कोळी (जुना सातारा, मरीमाता मंदिराजवळ भुसावळ), विशाल राजू टाक (रा.जामनेर रोड, वाल्मिक नगर, भुसावळ),
मोहंमद हासीम मोहंमद सलीम शेख (प्रल्हाद नगर, रींग रोड, भुसावळ), रमेश तुकाराम शिंदे (34, वराडसीम) या पाच संशयीतांना यापूर्वीच तर अलिकडेच मंगळवार, 8 मार्च रोजी मंगल देविदास कोळी (साकेगाव, ता.भुसावळ) व शेख नईम सलीम शेख (दिनदयाल नगर, भुसावळ) यांना एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते तर मार्च एण्डला संशयीत अजय प्रकाश तायडे (पिंप्रीसेकम) यास एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !