चोरी केलेले जेसीबी विकत घेणे पडले महागात : जळगावात संशयीताला अटक
जळगाव : जालना जिल्ह्यातून चोरलेले जेसीबी मशीन विकत घेणार्याला दूरदर्शन टॉवर येथून अटक करण्यात आली. संशयीताने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदलाल उर्फ करण राजेंद्र मोर्या (रा.ऑटो नगर अशोक नगर, जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जेसीबी चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी देवराज गजेबा सोनसाळे यांच्या मालकीची 7 लाख रुपये किंमतीची जेसीबी चोरी झाल्याची घटना 28 फेब्रुवारी रोजी उघडकीला आली होती. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान चोरीस गेलेले जेसीबी हे जळगावात विक्री झाल्याची माहिती मिळाली. जळगाव शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन गुन्ह्याची माहिती दिली.


सुनसगावात बंद घर फोडत 68 हजारांचा ऐवज लांबवला
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सय्यद, योगेश भारी पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी संशयित आरोपी नंदलाल उर्फ करण राजेंद्र मोरया (रा. ऑटो नगर, अशोक नगर जळगाव) याला शहरातील दूरदर्शन टॉवर येथून गुरुवार 31 मार्च रोजी अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या वाहनातून जेसीबी चोरून आणले ते वाहन (एम.एच.18 ए.ए.501) मिनी ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे. अधिक कारवाईसाठी संशयीत आरोपीला टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
भुसावळ तालुक्यातील उपद्रवी एक वर्षांसाठी हद्दपार


