शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात दोघा युवकांची गळफास घेत आत्महत्या
शहादा : शहरापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरगाव शिवारात दोन युवकांनी एका मोठ्या खाकराच्या झाडाला ठिबक नळ्यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्या दोघांची ओळख पटू शकली नसल्याने तपासासाठी पोलिसांना ते मोठे आव्हान ठरणार आहे.
ठिबक नळ्यांद्वारे घेतला गळफास
डोंगरगावपासून दोन कि.मी. अंतरावर वडछील रस्त्यावर वर्दळ नसलेल्या भागात एका टेकडीवर खाकराचे मोठे झाड आहे. त्याच्या मोठ्या फांदीला शेतात वापरण्यात येणार्या ठिबक सिंचनच्या नळ्यांच्या सहाय्याने या दोन्ही युवकांनी गळफास घेतलेला आहे. दोन्ही युवक साधारण 20 ते 22 वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी किमान आठ ते 10 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दोघांचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळाले असून दोन्ही युवक अनोळखी आहेत.




