धान्य वितरणात तांत्रिक अडचणी : मुक्ताईनगरात स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीन केले जमा
मुक्ताईनगर : ई पॉस मशीनवर धान्य वितरणामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता व 31 मार्चपर्यंत समस्या सोडवण्यात न आल्याने शुक्रवार, 1 एप्रिल रोजी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे वतीने तहसीलदारांकडे इ पॉस मशीन जमा करण्यात आल्या.
तहसीलदारांकडे ई पॉस मशीन केल्या जमा
सर्वर डाऊन , नेट न चालणे अशा असंख्य अडचणी येत होत्या.ई पॉश मशीनमुळे धान्य वितरणामध्ये अनियमितता येत होती. अडचणी दुर करण्यासाठी प्रशासनाला 31 मार्चपर्यंत अल्टीमेटम संघटनेने दिला होता.अडचणी दुर न झाल्याने 1 रोजी शुक्रवारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळा भालशंकर यांचे उपस्थितीत तालुक्यातील 85 स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले ई पॉस मशीन तहसीलदारांकडे जमा केले.




