बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Bodwad ACB Trap बोदवड : आठ हजारांचे लाच प्रकरण बोदवड तहसीलदारांसह चौघांच्या अंगलट आले असून चौघांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जळगाव एसीबीच्या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली.
या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये तहसीलदार योगेश्वर नागनाथराव टोंपे (32, रा.केअर ऑफ के.जे. पाटील संताजी नगर, मुक्ताईनगर, मूळ रा.शिवकृपा निवास, शारदा नगर, देगलूर, जि.नांदेड), तहसीलदारांच्या वाहनावरील चालक अनिल रावजी पाटील (51, रा.चिखली, ता.बोदवड), बोदवड तलाठी मंगेश वासुदेव पारीसे (31, रा.राजा चंद्रकांत सोसायटी, बोदवड) व खाजगी पंटर शरद समाधान जगताप (25, रा.रूप नगर, बोदवड, ता.बोदवड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.


शिरपूरातील लाचखोर बीडीओसह सहाय्यक लेखाधिकार्याची पोलिस कोठडीत रवानगी
आठ हजारांची लाच भोवली
34 वर्षीय तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे वाळू वाहतूक करणारे ढंपर 26 मार्च रोजी बोदवड तहसीलदारांनी बोदवड तालुका हद्दीतील सिंधी ते सुरवाडे गावाच्या दरम्यान रात्री थांबवले व सदर ठिकाणी तहसीलदार हे वाहनात बसलेले असतांना त्यांचा चालक व सोबत असलेला त्यांचा खाजगी पंटर यांनी नियमित हप्त्याचे 23 हजार रुपये जागेवरच वसुल केले शिवाय वाहन सोडण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच बोदवड तलाठी मंगेश पारीसे यांनी सुध्दा डंपरने वाळू वाहतूक करू देण्यासाठी दर महिन्याला तीन हजार रुपयांप्रमाणे लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.
लाच स्वीकारताच आवळल्या मुसक्या
शुक्रवारी सायंकाळी बोदवड तहसील कार्यालयात एसीबीने लावलेल्या सापळ्यानंतर तहसीलदार व चालक यांनी पाच हजार रुपये स्वीकारले तर तलाठी यांच्या सांगण्यावरून खाजगी पंटराने तीन हजारांची लाच स्वीकारल्याने एकाचवेळी चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली.
जळगावात त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या : तरुणाविरोधात गुन्हा
शिरपूरात सेवानिवृत्तीच्या दोन तास आधी बीडीओ जाळ्यात
शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज दलाल शिंदे (58, रा.आनंदनगर, प्लॉट नं 6, इंदिरा गार्डन जवळ, युगंधार बिल्डिंगसमोर, देवपूर, धुळे) व सहाय्यक लेखाधिकारी चुनीलाल गोपीचंद देवरे (44, रा.प्लॉट नंबर पाच, राजेश्वर नगर, एकवीरा शाळेजवळ, देवपूर, धुळे) यांना गुरुवारी दुपारी धुळे एसीबीने पाच हजारांची लाच घेताना अटक केली होती.
असे अटकेतील सहाय्यक लेखाधिकार्याचे नाव आहे. विशेष म्हणजे 31 मार्च रोजी युवराज शिंदे हे सेवानिवृत्त होणार होते व दोन तासांनी त्यांना निरोप देण्यात येणार होता व त्यासाठीची लगबग सुरू असतानाच एका शिक्षकाकडून पाच हजारांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आल्याने लाचखोरांच्या गोटात घबराट निर्माण झाली होती.
सेवानिवृत्तीच्या दिवशी लाचखोरीचा डाग : शिरपुरातील गटविकास अधिकार्यासह सहा.लेखाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात


