इंधन दरवाढीविरोधात रावेरात काँग्रेसचे आंदोलन : चारचाकी ओढत इंधन दरवाढीचा निषेध


रावेर : देशात महागाईने सर्वच क्षेत्रात उच्चांक गाठला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढले असून पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसें दिवस वाढत आहे. घरगुती गॅसचे दरही गगनाला भिडले असून शेतमालाच्या किंमतीला भाव कमी व बियाणे व खते यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सर्व गोष्टीच्या विरोधात महागाई मुक्त भारत आंदोलन आमदार शिरीष चौधरींच्या नेतृत्वात काँग्रेस भवन ते तहसील कार्यालयादरम्यान रॅली काढून महागाईचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

जळगावात त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या : तरुणाविरोधात गुन्हा z

यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, रावेर शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, तालुका उपाध्यक्ष विनायक महाजन, सचिव आर.एस.लाहसे, प्रकाश सुरदास, अ‍ॅड.योगेश गजरे, रंजना गजरे, संघरक्षक तायडे, राजू सवर्णे, भारत कुँवर, सावन मेढे, भूपेंद्र जाधव, ईस्माईल, पहेलवान, भाग्यश्री पाठक, मानसी पवार, मिलिंद पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.



बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !