भुसावळात गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसांसह आरोपी जाळ्यात

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई


भुसावळ : बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे बाळगणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. भुसावळ शहरातील घोडेपीरबाबा दर्गा परीसरात शुक्रवार, 1 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मझर शकील कुरेशी (मोतीराम नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शिरपूरातील लाचखोर बीडीओसह सहाय्यक लेखाधिकार्‍याची पोलिस कोठडीत रवानगी 

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलिसांना शहरातील घोडेपीर बाबा दर्गा परीसरात एक संशयीत गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या अंग झडतीत पंधरा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व तीन हजार रुपये किंमतीचे सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय नेरकर, रमण सुरळकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, चालक सहाय्यक फौजदार अयाज आदींच्या पथकाने केली.

बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !