जळगावच्या तांबापुरा भागातून चोरट्यांनी रीक्षा केली लंपास


जळगाव : शहरातील तांबापुरा भागातून पार्किंगला लावलेली रीक्षा अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी अयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबाापुरा भागातून रीक्षा लांबवली
याबाबत माहिती अशी की, विनोद लोटू पवार (वय-39) रा. रथ चौक, बारीवाडा, पिंप्राळा हे रिक्षाचालक असून त्यांच्याकडे (एमएच 19 बीयू 8623) क्रमांकांची बजाज रीक्षा आहे. रीरक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. 30 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील सिद्धिविनायक हॉस्पिटल तांबापुरा येथे त्यांनी रिक्षा पार्किंग करुन लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवार 31 मार्च रोजी समोर आली. त्यांनी परिससरात शोधाशोध केली परंतु रिक्षा कुठेही आढळून आले नाही. अखेर शुक्रवारी 1 एप्रिल रोजी एक एप्रिल रोजी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इम्रान सय्यद करीत आहे.



 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !