अज्ञात वाहनाने उडवल्याने जळगावातील प्रौढाचा मृत्यूू


जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीविठ्ठल नगरातील 55 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परीसरात घडली. रघुनाथ जयराम चव्हाण (55, रा.हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात
हरीविठ्ठल नगरातील रहिवासी रघुनाथ चव्हाण हे आपल्या पत्नी मिनाक्षी, लहान मुलगा कुणाल यांच्यासह वास्तव्याला आहे. एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरीला आहे. शुक्रवार, 1 एप्रिल रोजी रघुनाथ चव्हाण हे दुपारी 3 वाजेच्या सुमारास एमआयडीसी कंपनीतील काम आटोपून घराकडे निघाले होते. दरम्यान, घरी येत असतांना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.



रामानंद पोलिसात नोंद
एका खाजगी रिक्षाचालकाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांची मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.प्राथमिक तपास पोलीस नाईक सुर्यवंशी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !