दोन पिस्टल व पाच काडतुसांसह आरोपी जाळ्यात
शिरपूर तालुका पोलिसांची महामार्गावर गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावर संशयास्पदरित्या बॅग घेऊन उभ्या असणार्या तरुणाकडून 2 पिस्तूल, 5 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली. शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील विनायक ढाबासमोर गुरुवारी दुपारी प्रवीणसिंह देवीसिंह (27, रा.राजपूत वस्ती भूजंगगड, राजस्थान) उभा होता. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी त्याच्याकडे चौकशी केली. या वेळी त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगमध्ये 40 हजार रुपयांची 2 पिस्तुले, 2 हजार 500 रुपये किमतीचे पाच जिवंत काडतुसे सापडले. त्याला अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी सईद शेख यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.




