विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्या शिक्षकाविरोधात गुन्हा
म्हसदीत हाणामारीचे फुटेज शोधतांना धक्कादायक प्रकार आला समोर
धुळे : साक्री तालुक्यातील म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनीशी अंगलट व अश्लील चाळे करणार्या शिक्षकाचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे समोर आला. काही महिन्यांपूर्वी शाळेत झालेल्या हाणामारीचे फुटेज शोधतांना हा घाणेरडा प्रकार उघडकीस आला. कौतीक चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. पण संस्थेने कारवाई करण्याऐवजी या प्रकरणावर पांघरुण घातले. त्यामुळे शाळेतील लिपिकाने दिल्लीतील संस्थेकडे ऑनलाईन तक्रार दिली. त्यानंतर साक्री पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
लिपिकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयात कार्यरत लिपिक विजय भिलाजी अहिरे (वय 28 ) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार इंग्रजी विषयाचे शिक्षक कौतिक साहेबराव चव्हाण यांनी दहावीतील मुलींसोबत अंगलट, अश्लील चाळे करून विनयभंग केला. हा प्रकार 20 नोव्हेंबर 2019 ते 24 जानेवारी 2021 या दरम्यान घडला. याबाबत मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र अहिरे व त्यांचे पती नरेंद्र आत्माराम देवरे यांना कळवले. शिवाय फुटेज दिले होते.




