‘झायका’ टीचा ब्रॅण्ड देण्याच्या नावाखाली व्यावसायीकाची तीन लाखात फसवणूक


जळगाव : चहा विक्रीचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली एकाची तब्बल तीन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पर्ल टीच्या नावाखाली गंडा
शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन (48, रा.शेरा चौक, मेहरुण, जळगाव) हे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. 23 जानेवारी 2022 रोजी त्यांना अनोळखी नंबरवरून तीन फोन आले. पहिल्या नंबरवरून साबीर खान, दुसर्‍या नंबरवरून पप्पु खान आणि तिसर्‍या अनोळखी नंबरवरून तौसिफ खान असे नावे सांगितले. यावेळी शेख अहमद हुसेन यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून आसाम येथील ‘पर्ल टी’चा व्यवसाय करण्यासाठी सांगितले. शेख अहमद हुसेन यांना ‘झायका टी’ चा ब्रॅड बनविण्यासाठी तिघांनी फोन पे आणि दिल्या खाते क्रमांकाच्या माध्यमातून पैसे मागितले. तिघांच्या सांगण्यावरून शेख अहमद हुसेन यांनी 23 जानेवारी ते 1 एप्रिल दरम्यान वेळोवळी एकूण तीन लाख रुपये ऑनलाईन व खात्यावर जमा केले.



सायबर पोलिसात गुन्हा दाखल
दरम्यान चहाचा कोणताही माल पोहोचला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख अहमद हुसेन यांनी शुक्रवार 1 एप्रिल रोजी सायंकाळी सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !