मुसळीच्या प्रौढाची आत्महत्या


धरणगाव : तालुक्यातील मुसळी येथील 50 वर्षीय प्रौढाने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पांडुरंग पुंडलिक जाधव (50, मुसळी, वराड, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.

बोरखेड्यातील तरुणाच्या आत्म्हत्येप्रकरणी पत्नीसह तिघांविरोधात गुन्हा 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पांडुरंग पुंडलिक जाधव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला होते. शुक्रवार, 1 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी दसुरे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक उमेश भालेराव करीत आहे.



चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वेच्या आता 11 एप्रिलपासून आणखी दोन फेर्‍या 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !