भुसावळात चाकूच्या धाकावर दहशत : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात बुधवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणार्या एकाच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. प्रवीण राजू गवळी (रा.देवळाली कॅम्प, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
बाजारात पसरली घबराट
शहरातील आठवडे बाजारात बुधवारी रात्री एक तरुण हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करण्यात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस पथकाला पाठवले. आठवडे बाजार परिसरात हातात चाकू घेऊन प्रवीण राजू गवळी (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) हा दहशत निर्माण करीत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळील चाकू जप्त केला. ही कारवाई हवालदार विजय नेरकर, किशोर महाजन, दिनेश कापडणे, गोपाळ गव्हाळे, समीर तडवी आदींनी केली आहे. गवळी हा आठवडे बाजारात कोणाकडे आला होता याची माहिती पोलीस काढत आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.





