क्रेडीट कार्डचा ओटीपी विचारून औषध विक्रेत्या व्यावसायीकाला दोन लाखांचा गंडा
जळगाव : क्रेडीट कार्ड अॅक्टीव्ह करून देण्याच्या बहाण्याने ओटीपी विचारून व्यावसायीकाची दोन लाखात ऑनलाईन फसवणूक (Online Fruad) करण्यात आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Midc Police Station) अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूरात 25 हजारांत गर्भपात करणार्या बोगस डॉक्टरसह तिघे जाळ्यात
ऑनलाईन फसवणुकीच्या वाढताय घटना
मेडिकल चालक मोहद खालीद अब्दुल करीम (35, तलाठी ऑफीसच्या मागे, जुने मेहरूण) हे 19 फेब्रुवारी रोजी दुपारी ते त्यांच्या मेडीकल दुकानावर बसलेले असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला. आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असून क्रेडीट कार्ड अॅक्टीव्ह करून देतो व पीन जनरेट करून देतो, सांगत संशयीताने विश्वास संपादन केला व मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारून हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटवरून त्यांच्या क्रेडीट कार्डावरून परस्पर दोन लाख 12 हजार 100 रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोहद खालीद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Midc Police Station) तक्रार नोंदवली. पुढील तपास दीपक जगदाळे करीत आहे.

