Shehbaz Sharif पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ


Shehbaz Sharif इस्लामाबाद : माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे नेते शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असणार आहेत. पाकच्या संसदेत सोमवारी पंतप्रधानपदासाठी मतदान झाले असता शाहबाज यांना 174 मते मिळाली. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडून शाह महमूद कुरेशी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते मात्र ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याचवेळी पीटीआयच्या सर्व सदस्यांनी राजीनामा देत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे मतदान घेऊन शाहबाज यांच्या निवडीची औपचारीरकता पूर्ण करण्यात आली. शाहबाज हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान असतील. दरम्यान, यावेळी संसदेत बोलताना शाहबाज यांनी काश्मीरबाबत जुनाच राग

विरोधी पक्षांकडे आली सत्ता
पाकिस्तानातील सत्तासंघर्षात इम्रान खान यांची विकेट काढत विरोधी पक्षांनी सत्ता ताब्यात घेतली आहे. अविश्वास ठरावावेळी पळ काढणार्‍या इम्रान आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी आज पुढचे पाऊल टाकले. पंतप्रधानपदासाठी मतदान होण्याआधीच सर्व सदस्यांनी थेट राजीनामा दिला. त्यानंतर शाहबाज यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली गेली. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज यांनी संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इम्रानला लक्ष्य करतानाच भारत- पाक संबंधांवरही भाष्य केले.


तर त्याचक्षणी पदाचा देणार राजीनामा
पाकिस्तानात अविश्वास ठरावाच्या माध्यमातून प्रथमच एखादं सरकार कोसळलं आहे. आपल्याला प्रगती हवी असेल तर डेडलॉक ऐवजी डायलॉगवर भर द्यावा लागेल’, असे सांगतानाच ’पाकिस्तानात सत्ताबदल करण्यासाठी विदेशातून दबाव असल्याचे दावे केले गेले. हा आरोप सिद्ध करणारे पुरावे मिळाल्यास मी त्याचक्षणी पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन’, असे शाहबाज यांनी सांगितले.

काश्मी प्रश्न सुटेपर्यंत ‘ते’ शक्य नाही
शाहबाज (Shehbaz Sharif) यांनी आपल्या पहिल्याच भाषणात काश्मीरचा रागही आळवला. जम्मू आणि काश्मीरमधून भारताने कलम 370 हटवल्यानंतर इम्रान सरकारने त्याविरुद्ध पाऊल उचलणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत पण काश्मीर प्रश्न सुटेपर्यंत ते शक्य नाही. काश्मीरबाबत आमची भूमिका बदलू शकत नाही. त्यांना यापुढेही सर्व बाबतीत आम्ही पाठिंबा देत राहू. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, हा माझा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश असेल, असे तारे शाहबाज यांनी तोडले.

लाच भोवली : जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !